Sunday 17 May 2015

* मी त्याला 'एप्रिल फूल' बनवले * - April Fool Special Poem

प्रस्तावना : १ एप्रिल म्हणजे आपल्या प्रियजनांच्या खोड्या काढून त्यांना फसवून 'एप्रिल
फूल'बनवण्याचा हक्काचा दिवस.माझ्या 'नक्की कोण तू माझा'या कवितेच्या नायिकेला पडलेल्या
प्रश्नाचे उत्तर ती ह्याच 'एप्रिल फूल'चा आधार घेउन शोधायचे ठरवते.१ एप्रिल ला त्याला मनातले
खरे सांगून तो जर म्हंटला की आपण फक्त दोस्तच आहोत तर त्याला 'एप्रिल फूल'म्हणून ही
दोस्ती कायम ठेवावी पण जर त्याच्याही मनात प्रेम असेल तर सर्व प्रश्न मिटतील ह्या उद्देशाने
नायिका त्याला खरे सांगते..त्याच्यावर ही कविता..

 
** मी त्याला 'एप्रिल फूल' बनवले **

'नक्की कोण तू माझा' प्रश्नाचा मी निकाल लावायचे ठरवले,
निकालाचा दिवस 'एक एप्रिल' ला निवडले,
प्रेमपत्र त्याच्या हातात दिले,
नजर त्याची झाली कावरीबावरी,
वाटलं हिची लग्नपत्रिकाच..हातात पडली..

त्याच्या चेह-यावरचे भाव वाचत होते,
माझ्या उतराच्या मी जवळ जात होत्ते,
आनंदाने तो बोलला,माझ्या मनातले बोललीस,
तुला विचारायची इच्छा होती पण नकाराने,
दोस्ती तुटु नये हीच काळजी होती..

विचार केला, विमान याचे खाली आणूया,
म्हटले त्याला, अरे वेडया, 'एप्रिल फूल' केले तुला,
दोस्तीत आपल्या प्रेम बिम आणाच कशाला,
उसने हसु आणत कसाबसा बिचारा बोलला,
'जातो,उशीर झालाय'..म्हणत त्याने रस्ता धरला..

डोळे भरले होते त्याचे,मी ही काही क्रूर नव्हते,
धावत त्याला थांबवले,परत 'एप्रिल फूल' बोलले,
माझ्या डोळ्यांतले भाव त्याने ऒळखले,
'एक एप्रिल'ने मैत्रीत प्रेमाचे धागे गुंफले,
'नक्की कोण आम्ही एकमेकांचे' ह्या प्रश्नाचे उत्तर दिले..

जीवनाकडे पाहण्याचा सुंदर दृष्टीकोन - Nice Thought for Life

बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेतकऱ्याला घरकामासाठी, तबेला व घोड्यांची निगा राखण्यासाठी एक नोकर हवा होता. एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला. त्याने नोकरी मागितली. "तू काय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले. मुलगा म्हणाला, "वादळीवाऱ्यासह गडगडाटी धुवाधार पाऊस पडत असताना मी रात्री गाढ झोपू शकतो !'
वेगळं वाटलं. शहराला जायची घाईही होती. त्याने मुलाला ठेवून घेतले. आठवड्याचा बाजारहाट करून तो आला. थकला होता. लगेच झोपायला गेला. मध्यरात्री सोसाट्याचा वारा, मोठा गडगडाट घेऊन धुवाधार पाऊस सुरू झाला. त्याची झोपमोड झाली. बाहेर पटांगणात गवत वाळायला टाकले होते. तबेल्यात घोड्यांसाठी गवत भरलेले नव्हते. पाणीही ठेवलेले नव्हते. त्याला काळजी वाटली. त्याने नोकराला जोरजोरात हाका मारल्या. त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. घरात तो कुठेच नव्हता. शिव्या घालीत मालकाने रेनकोट चढवला; छत्री, विजेरी घेतली. माळावर गेला. सर्व गवत आवरून, त्याचे ढीग करून आच्छादून ठेवलेले दिसले. तसाच धावत तबेल्यात गेला. गव्हाणीत गवत, पाण्याची पातेली भरून ठेवलेली दिसली. घोडे चारापाणी खाऊन समाधानाने झोप घेत होते. त्याने कुतूहलाने पाहिले, वरच्या माळ्यावर जागा स्वच्छ करून त्याचा नवा नोकर शरीराचे मुटकुळे करून घोरत होता! निसर्गाचे एवढे तांडव बाहेर चालले होते, ते त्याच्या गावीही नव्हते.
नोकर शांत झोपू शकला. कारण त्याला ताण नव्हता. का नव्हता? झोपायला जायच्या आधीच त्याने आपली सर्व कामे व्यवस्थित पूर्ण केली होती. तिथे ताणाला आत शिरायला फटच नव्हती!.

कुठलंही काम, प्रॉजेक्‍ट, कुठलीही कंपनी आणि कुठलाही अमेरिकन, युरोपियन क्‍लाएंट तुमच्या जिवापेक्षा मोठा नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या, कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल, झेपेल एवढंच काम हातात घ्या; त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. तुमच्या जिवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम ऑफिसमधल्या कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देणारं ठरतं. ऑफिसमधले ताणतणाव, स्पर्धा, पक्षपात इ. इ. घरी घेऊन न येता, तिथंच विसरून या. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा.
तुमच्या जिवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही, याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचाच हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ.चा उपयोग करा. हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.


दोन तत्त्वं :

"एक म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी ताण निर्माण करू नका."
"दुसरं म्हणजे आयुष्याच्या अखेरीस सगळ्या गोष्टी क्षुल्लकच असतात " :)

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

पिझ्झा ( जगण्याचा अन खर्च करण्याचा नवीन अर्थ )

पिझ्झा ( जगण्याचा अन खर्च करण्याचा नवीन अर्थ ) - Pizza Very Nice Story

तुला माझ्याबद्दल काय वाटत?? - अप्रतिम कथा ( Marathi Love Story )

लग्नाला बारा वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ... तुला माझ्याबद्दल काय वाटतं ? तो बावचळला ... गोंधळला ... आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... ! प्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं हो ... तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडे ही एकदम भारी भारी उत्तरं तयार असायची ... पण मग लग्न झालं ... संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली ... आणि काल परवा अचानक हा गुगली पडला ... त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती .. हातात लाटणं ... समोर तापलेला तवा ... त्यानं संभाव्य धोका ओळखला .. आणि 'सांगण्यासारखं प्रचंड आहे .. संध्याकाळी सावकाशीनं सांगतो ...' असं म्हणून तो कामावर सटकला ... ! तो घरातून बाहेर पडला खरा ... पण घर काही डोक्यातून बाहेर पडलं नव्हतं .. ! अख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेला ... कठीण असतं हो ... नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण असतं .. तो विचार करत होता .. काय सांगावं .. ? मी राजा .. तू माझी राणी वगैरे काही म्हणावं का ... नको .. फार फिल्मी वाटतं .. तू खूप छान आहेस ... असं म्हणावं ... नको ... तिला ते फारच रुक्ष वाटण्याची शक्यता आहे .. समजूतदार सहनशील वगैरे म्हणावं ... तर ती नक्की म्हणेल ... राजकारण्यांसारखी उत्तरं देऊ नकोस ... त्याला काहीच सुचेना ... बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं ... हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ... लाईन लागेल नवऱ्यांची ... त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते .. सूर्य मावळला ... घरी जायची वेळ झाली .. आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्याची भुवई वर जाणार ... याची त्याला खात्री होती ... घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता ... त्यानं बेल वाजवली .. अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही .. त्याच्या मुलानं दार उघडलं ... आणि पुढच्याच क्षणी कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला ... मुलगा जवळ जवळ उडी मारत म्हणाला ... भजी केलीत आईनं ... पटकन हातपाय धुवून या ... तो मान डोलावून आत गेला ... आणि पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला ... बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली ... त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं ... तिनं तोंडभर हसून विचारलं .. काही सुचलं ... ?  


त्यानं नकारार्थी मान हलवली ... तशी ती पटकन टाळी वाजवून आनंदानं म्हणाली ... मलाही नाही सुचलं ... ! तो पुन्हा गोंधळला ... इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया ... ? आणि ती बोलतच होती ... काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं ... तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं ... ? सात दिवस विचार केला .. पण मला काही सांगताच येईना ... मग भीति वाटली ... माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय .. ? अपराधी वाटायला लागलं - काय करावं कळेना ... मला स्वतःविषयी शंका होती पण बारा वर्षानंतर ही तुझं प्रेम कणभर ही आटलेलं नाही याची खात्री होती. म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला ... वाटलं .. तुला उत्तर देता आलं तर आपण 'Fault' मध्ये आहोत .. पण नाही ... तुलाही उत्तर देता आलं नाही ... म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत ... जिथे फक्त 'वाटणं' संपून 'वाटून घेणं' सुरु झालंय ... आता शब्द सापडत नाहीत ... आणि त्याची गरजही वाटत नाही ... कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिध्द करण्याची धडपड संपलीय ... असं म्हणून तिनं एक कांदा भजी. त्याला भरवली ... शपथ सांगतो ... त्याच्या बारा वर्षाच्या संसारामधला सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होता ..:)

एंक खूप छान कथा.....शेवंती



कायद्याने दोघे वेगळे
झाल्यावर त्याने
राहतं घर विकायला काढलं.
ब्रोकरच्या थ्रू तिच्या
वडिलानीच ते घर
विकत घेतलं......
पून्हा घराची
एक किल्ली
त्याच्या हातात
देत म्हणाले...
'मी माझ्या लेकीला
ओळखतो .....
तसा तुलाही.. ...
सगळ्या गोष्टी
भावनेच्या भरात करतोस...
अगदी माझ्या
लेकीशी लग्न सुद्धा......
पून्हा भावनेच्या भरात
एकत्र यावसं
वाटलं तर?
तसं व्हायला नको...
म्हणून
ही रिकामी वास्तू
तुझ्या हवाली
करतो......
कधी वाटलं तर
येऊन बसत जा.....
"भरल्या घरा पेक्षा
रिकामं घर जास्त
बोलतं आपल्याशी......"
भावनेपेक्षा विचार
जास्त ठाम असतात......
विचारांवर ठाम झालास
तर ......
घेतल्या निर्णयाचा
पश्चाताप होणार नाही.. ...
निर्णय ठाम झाला की
माझी किल्ली
मला परत दे. .....
नाहीतर येऊन
माझी मुलगी
परत घेऊन जा......'
आणि खरच तो
ढळत्या दुपारी
रिकाम्या घरात
बसायला लागला......
कलंडणारी ऊन्ह
आपल्या घरात
अशी ऐसपैस पसरतात
त्याला माहीतच नव्हतं... ...
मावळतीचा वारा
अख्ख्या घराचा
ताबा घेतो ..   ..
याची त्याला
कल्पनाच नव्हती...
एक चूकून राहिलेलं
'कालनिर्णय' होतं
भिंतीवर वार्‍याने
फडफडत होतं ....
त्या फडफडण्याचा
आवाज सुद्धा त्याला
नवा होता... ...
त्याने जवळ जाऊन
बघितलं ......
कसल्या कसल्या नोंदी
त्यावर तिने करून
ठेवल्या होत्या...
कसली बीलं
देण्याची तारीख,
दूधाचा हिशोब,
कामवालीचे खाडे,
पेस्ट कंट्रोलची
तारीख...
सिलेंडर संपल्याची तारीख,
ग्राहकचं सामान
येण्याची तारीख...
इस्त्रीचे कपडे
त्याचा हिशोब
या कशातच
तो सहभागी नव्हता... ..
अगदी तिच्या
महिन्याच्या तारखा...
तारीख पुढे गेलीतर....
त्याला गलबलूनच आलं ....
या कशा कशातच
आपण सहभागी नव्हतो.. ...
ती एकटीचा डाव
खेळत राहीली आणि
आपण फक्त.......
तक्रार करत राहिलो.....
त्याला त्या 'कालनिर्णय'
समोर उभं राहणं
शक्य होईना. .....
तो बेडरूम मधे आला
त्याने
खिडकी उघडली .....
खिडकीत तिने
हौसेनं लावलेली
शेवंती होती ......
वाळून वाळून
झूरायला आलेली ....
तिला भिजवयला
तो आतूर झाला,......
कातर झाला...
पाणी घालायला
भांड नव्हतं .......
त्याने कूंडीच
सींक मधे नेली
यथेच्छ पाणी शिंपडलं.....
तहानलेली शेवंती
गटा गटा पाणी प्यायली.. ....
आणि तोच तृप्त झाला......
तेवढ्यात लँच कीने
दार उघडल्याचा
आवाज आला .......
ती आली होती......
शेवंतीसारखीच... .....
तिला समोर बघून
तो उनमळून गेला... ...
काय अवस्था
करून घेतली
आहे हिने... ....
हिच्या आयुष्यातलं
आपलं स्थान
आपल्या लक्षात
कसं आलं नाही?... ....
की आपण लक्षात
घेतलं नाही?
जिद्दीला पेटून
भांडते तेंव्हा
ती कुठल्याही
टोकाला पोहोचते
हे काय आपल्याला
लग्नाआधी माहीत नव्हतं?.....
दोघांची नजरा नजर झाली...
दोघे क्षणभरासाठी स्तब्ध.....
ती म्हणाली,
"मी ही शेवंतीच
न्यायला आले
होते... "
तो गलबलून म्हणाला,
"आत्ताच पाणी दिलय... ...
तिचं निथळणं
संपेपर्यंत थांब ना......"
आणि ती थांबली......
..अगदी...   कायमची...!!! 


पाहताक्षणी एखादी
व्यक्ति आवडणं
हे 'आकर्षण'असतं.....
परत पहावसं वाटणं
हा 'मोह'असतो....
त्या व्यक्तिच्या
जवळून जाण्याची
इच्छा असणं
ही'ओढ'असते.....
त्या व्यक्तिला
जवळून जाणणं
हा 'अनुभव' असतो.....
आणि त्या व्यक्तिला
तिच्या गुणदोषांसह
स्विकारणं .......
हेच खरं "प्रेम" असतं.....
हेच खरं "प्रेम" असतं.....
नात्याची सुंदरता
एकमेकांच्या चुका
स्वीकारण्यात आहे.....
कारण एकही
दोष नसलेल्या
माणसाचा
शोध घेत बसलात.......
तर आयुष्यभर
एकटे राहाल......
विश्वास उडाला
की आशा संपते......
आणि काळजी घेण
सोडल की प्रेम......
म्हणुन, विश्वास ठेवा,....
आणि काळजी घ्या.......
आयुष्य खुप सुन्दर आहे........
लेखक : चंद्रशेखर गोखले

मराठी उखाणे

सुंदर सुंदर उखाणे.......
"नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा ,
.........रावांचे नाव असते ओठावर पण प्रश्न असतो उखाण्यांचा !!"
"नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद ,
..........चे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रसाद !"
"अमूल्य आहेत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद न सदिच्छा ,
असेच सदैव मी व ...........च्या पाठीशी राहा हि मनीषा !"
"कळी हसली ,फुल उमलले,मोहरून आला सुगंध,
.........च्या सोबतीत मला गवसला जीवनाचा आनंद !"
"आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद ,
.........चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद!"
"एका वर्षात महिने असतात बारा,
......... या नावात सामावलाय आनंद सारा!"

"दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
.........चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी!"
"आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
...........चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा!"

Tuesday 7 April 2015

“Star Plus”

Shadi k bad agr Larki ko Susral
Wale bure lagne lagen
tou Samaj Lo K,
.
.
.
.
.
.
“Star Plus” works. 




Sawal: Patni maike jakar pati ko
roj phone kyun krti h?
Jawab: Taki pati ko yad rahein
musibat tali nhi